Ad will apear here
Next
मुलांच्या डब्यासाठी ४०४ पौष्टिक रेसिपीज
मुलांचा डबा हा प्रत्येक आईचा काळजीचा विषय असतो. मुलांचा उत्साह टिकून राहावा असा पोषक आहार त्याला मिळावा यासाठी प्रत्येक आईची धडपड सुरु असते. तरी पोषकही असेल आणि मुलाला आवडेलही असं रोज डब्यात द्यायचं तरी काय, असा प्रश्न प्रत्येक आईला पडतो. अशा वेळी हे पुस्तक वाचा. तुमच्यासमोर निरनिराळ्या पदार्थांचा खजिनाच खुला होईल.

लेखिका कांचन बापट यांनी प्रथम पुस्तकात मुलांना दिवसभरतील खाणं काय, कधी आणि कसं द्यायचं, याचं मार्गदर्शन केलं आहे. गव्हाचे, पोह्याचे, पोळीपासून बनविले जाणारे पदार्थ ब्रेड, उप्म्याचे प्रकार, स्नॅक्स, कटलेट, भाताचे प्रकार, भोपळा, मका, ओल्या धान्याचे पदार्थ, पॅटीस, तिखट वड्यांचे, धिरड्यांचे, केकचे, पॅनकेकचे पदार्थ अशा विविध पदार्थ्यांच्या रेसिपीज पुस्तकात दिल्या आहेत.




 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IZNBBE
Similar Posts
व्हॉट्स अप ? 'ही गोष्ट आहे डॉ. सुजय शास्त्रीची, एका रेडिओलॉजिस्टची! आपल्या रोजच्या एकसुरी आयुष्याला कंटाळलेल्या सुजयला आयुष्यात काहीतरी 'थ्रिलिंग' घडावं असं वाटत असताना, 'व्हॉट्स अप'मुळे त्याच्या आयुष्याला कशी कलाटणी मिळते, त्याची ही गोष्ट...' डॉ. अमित बिडवे यांनी प्रस्तावनेतच कादंबरीची अशी उत्कंठावर्धक सुरवात केली आहे
पिंपळपान भाग - २ आयुष्य नित्यनेमाने जगत असताना अनेक आठवणी मनात खोल जपल्या जातात. तसेच आयुष्यात हवे असते, ते कधी कधी पुढ्यात येऊनही मिळत नाही, असे सांगणाऱ्या, आयुष्याचा प्रत्येक कंगोर उलगडणाऱ्या 'मेनका'तील लेखकांच्या भावस्पर्शी कथा 'पिंपळपाण (भाग २) मध्ये संग्रहित केल्या आहेत. कमला फडके यांच्या कथेतील तर काश्मीर ट्रीपमध्ये
सकलराजकार्यधुरंधर सदाशिवरावभाऊ बाळाजी बाजीराव उर्फ थोरले नानासाहेब पेशवे यांचे धाकटे चुलतबंधू व त्यांना कायम साथ दिलेले सदाशिवरावभाऊ उर्फ भाऊसाहेब यांची आठवण फक्त एकाच घटनेवरून येते ती म्हणजे पानिपतची लढाई. हि लढाई 'भाऊं'मुळे मराठे हरले असा समज आजही आहे. पण खरी वस्तुस्थिती काय आहे हे सांगत कौस्तुभ कस्तुरे यांनी 'सकलराजकार्यधुरंदर
करिअर कसे निवडावे करिअर म्हणजे काय, ते कसे असावे, आनंद देणारे, आयुष्य जपणारे, खुलवणारे, नाती जपणारे आणी महत्वाचे म्हणजे आवड जपणारे. स्वतःची क्षमता, आवड, अभिरुची, समजून निवडलेले,' असे या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटले आहे परंतु करिअर निवडायचे कसे? दिपक बिचे यांनी या पुस्तकात याच प्रश्नाचे उत्तर दिले आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये एक राजहंस दडलेला असतो

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language